धनंजय सरदेशपांडे. पुणे
आमची हिरोईन दीपा - दीपाची मैत्री कधी सुरू झाली ते आठवत नाही पण नाटकामुळे झाली आणि ती इतकी घट्ट झाली की फेविकॉल का जोड है. कॉलेज मध्ये नाटके बसवली जायची त्यात दीपा स्मार्ट असल्यामुळे हिरोईन असायची आणि आम्ही दिन, दुबळे, कामगार, झोपडपट्टीत राहणारे किंवा दारू पिऊन रेप करणारे असले सगळे रोल आमच्या वाट्याला यायचे. दीपा अॅक्टिंग चांगली करायची तिला अनेक वेळा अभिनयाची बक्षीस सुद्धा मिळाली आहेत. पण तिने मी खूप मोठी अभिनेत्री आहे असं कधी दाखवल नाही. ती कायम शांत पण हसतमुख असायची.
कॉलेज संपल्यावरही आमची मैत्री तशीच राहिली. नंतरही आम्ही काही नाटके सादर केली. या निमित्ताने तिचा स्वभाव जवळून पाहता आला. कायम मदतीला धावणे, पंधरा दिवसातून एकदा तरी माझ्या घरी सगळे मित्र- मैत्रिणीची मैफल जमायची. मी एकटा असल्यामुळे सगळे मिळून स्वपाक करायचे यात मोठा वाटा दीपाचा असयचा. घराची साफ सफाई करण्यातही ती मदत करायची. आजही ती मला अनेक गोष्टींमध्ये सातत्याने मदत करीत असते मग ते माझ्या मुलीच नूपुरच अॅडमिशन असो नाही तर माझ्या चैतन्य ला लागणार एखादं पत्र.
ती शांत जरी असली तरी आपल्या मतांवर ठाम असते . मी तिच्या औरंगाबाद, मासवण, मुंबई आणि आता पुणे असा सगळ्या प्रवासाला मी साक्षीदार आहे.
कौतुक करणे, प्रोत्साहन देण्यात दीपाचा हात कुणी धरणार नाही. माझ्यासारख्या अनेकांना अनेक ठिकाणी शिबिरासाठी घेऊन जाऊन माझ्यातला आत्मविश्वास वाढविण्याच काम ती करायची. मी तिच्या बरोबर जळगाव, सांगली, औरंगाबाद, मासवण इत्यादि ठिकाणी वेगवेगळ्या लोकांसमोर गेलो. आम्ही दोघे “ माणसांची भाषा “ या सुबोध जावडेकर यांनी लिहिलेल्या कथेच अभिवाचन करायचो. ती कथा वाचायला दीपा शिवाय मी दुसर्या कुणाचा विचार करू शकत नाही. इतकं सुंदर असं तिचं वाचन आसयच.
तसच माझ्या प्रत्येक कार्यक्रमाला ती हजर असतेच. कायम मला ती प्रोत्साहीत करायची आणि करते मग त्यात सलाम मधील छोटी भूमिका असो नाहीतर दोन शुन्यांची बेरीज नाटक असो किंवा माझ्या पुस्तकाच प्रकाशन असो तिनं तोंड भरून स्तुति केली नाही असं होतच नाही.
दीपा म्हणजे सर्वे गुणसंपन्न ! तिने डॉक्टर अभय बंग यांच्या निर्माण मध्ये काही वर्ष काम केलेलं आहे. ती नॅचरोपथीची डॉक्टर आहे, ती संगीत विशारद आहे. तिने काही काळ ब्युटी पार्लर चालवलेल आहे , काही दिवस ती लेडिज ड्रेस शिवायची, तिला चित्रकले मध्ये आवड आहे, अभ्यास आहे, ती संवादा वर ट्रेनिग देते. वेगवेगळे शिबीर घेते. मुख्य म्हणजे तिने आदिवासी भागात राहून तिथल्या मुलांच्या शिक्षणासाठी काम केलं आहे. शहरात राहिलेल्या दीपाच असं एकदम दुर्गम आदिवासी पाड्यापाड्यातलं गुडघाभर चीखालातल फिरणं मी बघितलं आहे.
आज हे सगळं सांगायच कारण म्हणजे तिचे पाच पुस्तके मनोविकास प्रकाशनाने काढले.. तुमचे आमची सुपर हीरो या मालिकेतील पाच हीरो आहेत
01. आनंद नाडकर्णी , सू प्रसिद्ध मनो विकार तज्ञ
02. अरविंद गुप्ता, मुलांसाठी झटणारा जगावेगळा विज्ञान वेडा जादूगार
03. अनिल अवचट, हर हुन्नरी कलावंत
04. अच्युत गोडबोले, कोणत्याही विषयाचा सहा महिन्यात फडश्या पडणारा दिग्गज .
05. डॉक्टर प्रकाश आमटे, आदिवासी मध्ये आपलं जीवन समर्पित करणारा.
ही पुस्तके मुलांबरोबर पालकांनीही वाचलीच पाहिजे. अत्यंत सध्या, सोप्या आणि ओघवत्या शैलीत लिहिलेले आहेत. हे माणसे जेव्हडी मोठी आहेत तेवढी साधी आहेत आणि हे सूत्र वापरुन दीपाने त्यांचा जीवन प्रवास मांडला आहे. पुस्तकांची सजावट, आतील मांडणी खूप सुंदर आहे. ह्या मोठ्या माणसांबदधल लिहिताना तिने त्यांच बालपण, त्यांच्यावर झालेले संस्कार आणि संघर्ष असा चढता आलेख तिनं चित्रित केला आहे.
मला जाणवलेल विशेष म्हणजे ह्या पुस्तकांसाठी दीपाने कुणाची प्रस्तावना घेतली नाही, की स्वत:च मनोगत मांडल नाही की ही पुस्तकं विशिष्ट व्यक्तीला अर्पण पण केली नाहीत. ह्या सगळ्या व्यक्ति इतक्या मोठ्या आहेत त्या साठी ह्या सगळ्याची गरज नाही. ही पुस्तके सर्व दूर पोहचावी म्हणून किम्म्त एकदम कमी आहे म्हणजे 50 ते 90 रुपये.
दीपा तू लिहायची, कविता करायची पण तू केव्हा मोठी लेखिका झाली कळलेच नाही. आता तुझं अच्युत गोडबोले यांच्या बरोबर “ कॅनव्हास “ नावच पुस्तक येतय. त्याचही आपण स्वागत करुयात.
दीपा हे सगळे तुमचे- आमचे हीरो आहेतच पण आमची खरी हिरोईन मात्र तूच आहेस. असाच तुझ्या आयुष्याचा “ कॅनव्हास “ मोठा व्हावा हीच शुभेच्छ्या.
धनंजय सरदेशपांडे.पुणे