अंबिका टाकळकर 

अंबिका टाकळकर 

नुकतेच जीचे पाथ फाइंडर ही दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ज्यामध्ये माझाही समावेश केला आहे, अतिशय साधी पण अफाट वाचन, लिखाण असलेली, कॉटनची साडी हा दोघींचा जिव्हाळ्याचा विषय, छोट्या छोट्या गोष्टींवर पण भरभरून प्रेम करणारी, वाचन, लेखन, यासोबतच भरत काम, शिवण असे अनोखे छंद असणारी, औरंगाबादला आली तेंव्हा आवर्जून वेळ काढून आरंभला भेट दिली, मुलांचं कौतुक केलं, त्याच दिवशी एरवी शांत असणारा, श्रीहरी काही कारणाने खूप चिडला होता पण तितक्याच शांतपणे मला समजून घेत, अग तू का वाईट वाटून घेतेस, मी समजू शकते अस म्हणत एक्षा क्षणात वातावरण बदलून टाकलं, अशी ही माझी मैत्रीण, म्हण्यापेक्षा ताई,जिच्या जवळ अगदी मनातलं बोलू शकतो अशी दीपा देशमुख ह्यांचा आज वाढदिवस. आरंभच्या सर्व मुलांकडून तसेच पूर्ण आरंभ टीम कडून हार्दिक शुभेच्छा !!

अंबिका टाकळकर