किरण काळे
तांड्यावरील कुटुंबियांना लेखिका दीपा देशमुख यांच्या कडून मायेची ऊब. थंडी अजून सरलेली नाही. जोर कायम आहे. मोकळ्या माळरानावर तर ती अजूनच बोचते. अशा थंडीत कुडकुडणा-या अबाल वृद्धांना सुप्रसिद्ध लेखिका दीपा देशमुख यांनी मायेचा हात आज देऊ केला. दीपाताई यांनी पुण्याहून तांड्यावरील महिला, आबालवृद्ध यांना ऊबदार कपडे, ब्लँकेट उपलब्ध करून देत त्यांना मायेची ऊब दिली.
मागील महिन्यात औरंगाबादला कार्यक्रमा निमित्त जाताना दीपाताई यांनी तांड्यावरील चीमुरड्यांशी संवाद साधत त्यांना उज्वल भवितव्यासाठी प्रेरित केले होते. त्यांना गाणी शिकवली होती. स्वच्छतेचे महत्व पटवून दिले होते. सामाजिक कार्यात दीपाताई या नेहमीच हिरीरीने सहभागी असतात. नव्हे कार्यकर्त्या म्हणून पदर कंबरेला खोचून त्या स्वतः कामाला लागतात. दीपाताई यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा !